वाढते वजन, बैठी जीवनशैली, घरातली हिस्टरी, हायपोथायराॅईड असणे सगळेच डायबेटिसकडे बोट धरुन चालवायला लागले. एक दिवस टेस्टमध्ये HbA1c रिपोर्ट 6.1 आला आणि डोळे खाड्कन उघडले!
मग सुरु झालाय जीवनशैली आणि खाण्यामधले बदल करण्याचा प्रवास. हेच या खाद्ययात्रेचे निमित्त.
मला सध्या ५:२ या प्रकारची डाएटप्रणाली डाॅक्टरांनी सुचवली आहे.
५:२ म्हणजे आठवड्याचे पाच दिवस तीन वेळा नाॅर्मल जेवण आणि दोन दिवस ५०० कॅलरीत बसेल इतकेच दिवसभरात खाऊन एक प्रकारे उपास करणे.
माझ्या बैठ्या जीवनशैलीमुळे मी दिवसभरात ११०० कॅलरी खाऊ शकते. तीन जेवणात मिळून मला हा कोटा वापरायचा आहे.
परत यात कहानीमें ट्विस्ट आहेच!
मला वर दिलेल्या निरनिराळ्या गोष्टींमुळे हाय प्रोटीन खाणे खायचे आहे. कार्ब कमी करायचे आहेत. मग डाॅक्टरांनी मला पॅटर्न सांगितला आहे.
तिन्ही जेवणात प्रथम प्रोटीन, मग सॅलड मग तिसरा भाग कार्ब असणारे अन्न म्हणजे पोळी, भाकरी ,भात ,खिचडी इ.
त्यामुळे मला रोज डाएट प्लॅन करणे, त्याची डायरी करणे आवश्यक आहे. शोध घेऊनही मला ५:२ यावर लिहिलेले इंडियन व्हेज डाएट प्रकार फारसे आढळले नाहीत. जे मिळाले ते त्रोटक. म्हणून या ब्लाॅगवर मी माझी फुड डायरी कॅलरी काऊंट आणि nutrient values सकट लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. So stay tuned for my weekly diary from this Sunday
तोपर्यंत Happy living. Stay healthy Stay positive 😍